गर्ल्स महाविद्यालयाच्या संस्कृतीला कला शाखेत ९२.३३ टक्के   

0
16
गोंदिया ः येथील एस. एस. गर्ल्स महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या महाविद्यालयाची विद्यार्थिनी संस्कृती महेश भेंडारकर हिने ९२.३३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ज्योती नरेश बोकडे हिने ८१ टक्के, गुंजण रवींद्र काठेवारने ८०.१७ टक्के गुण मिळविले. त्याचप्रमाणे विज्ञान शाखेतील तनुश्री कपाट हिने ७९.१७ टक्के, तानिया उके हिने ७६.५० टक्के, ईशा भेंडारकर हिने ७४.८३ टक्के गुण मिळविले. तसेच कला शाखेतील इशिका पियूष तिवारी याने ७७.८३ टक्के, दिशा जितेश उजवणे हिने ७७.५० टक्के, निलाक्षी रोशन हिरापुरे हिने ७६.३३ टक्के गुण मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांचा प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.