सावली शाळा येणाऱ्या दिवसात महाराष्ट्रात नेत्रदीपक म्हणून काम करेल- उपाध्यक्ष सुरेश हर्षे

0
19

जिल्हा परिषद आदर्श शाळा सावली येथे प्रवेश उत्सव कार्यक्रम उत्साहात

 देवरी – ; उन्हाळ्याची गर्मी संपल्याबरोबर 23 तारखेला शाळेची घंटी वाजली पहिल्याच दिवशी आवडते शिक्षक व सवंगड्यांना भेटण्याची ओढ, नवीन गणवेश आणि शालेय साहित्य मिळाल्याने बाल विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर पसरलेला आनंद ओसंडून वाहताना दिसला जिल्हा परिषद गोंदिया तर्फे प्रवेश उत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्याच्या सूचना सर्व मुख्याध्यापक यांना देण्यात आल्या जिल्हा परिषद शिक्षण सभापती यांनी सावली शाळेला भेट देऊन तेथील मनमोहक परिसराचे व आनंददायी शिक्षण पूरक वातावरणाचे भरभरून कौतुक केले येणाऱ्या दिवसात संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व सावली शाळेने करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरगानंथम यांच्या मार्गदर्शनात, जिल्हा परिषद अध्यक्ष लाईकराम भेंडारकर यांच्या नेतृत्वात, तसेच शिक्षण सभापती सुरेश हर्षे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सवाची धूम बघायला मिळाली. त्यातच नागपूर विभागात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात दुसरा क्रमांक प्राप्त असणारी शाळा देवरी तालुक्यातील प्रख्यात व नावाजलेली जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक आदर्श शाळा सावली येथे शिक्षकांसह शालेय समितीतील पदाधिकार्‍यांनी शाळेत पाऊल ठेवणार्‍या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, सुमधुर गीतांच्या निनादात स्वागत केले. आकर्षक परिसर,एखाद्या रिसॉर्ट मध्ये बघावयास मिळणारे वातावरण,सुंदर रंगरंगोटी, फुग्यांनी व रांगोळीने केलेली सजावट यामुळे सावली शाळा अधिकच नवीन प्रवेश दाखल विद्यार्थ्यांचे मन आकर्षित करत होती.जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांच्या हस्ते प्रवेश दाखल कॉन्व्हेंट व पहिली मधील विद्यार्थ्यांचे गणवेश व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी आपल्या मनोगतातून जिल्हा परिषद सावली शाळेची सुंदरता खरोखरच मन वेधणारी असून शाळेचे मुख्याध्यापक संदीप तिडके यांनी लोकसभागातून व सहकारी शिक्षकांच्या मदतीने शाळेचा कायापालट केला असून येणाऱ्या दिवसात सावली शाळा संपूर्ण महाराष्ट्रात उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली व गावाचे व शाळेतील सहकारी शिक्षकांचे भरभरून कौतुक केले. यावेळी कैलाश कारंजेकर, उपविभागीय अभियंता, केंद्रप्रमुख डी टी लाडे,रोहित पटले, कनिष्ठ अभियंता,मारोती नागरगोजे, कनिष्ठ अभियंता, डॉक्टर उमाटे, सरपंच झुलनताई पंधरे, पोलीस पाटील चंद्रसेन रहांगडाले,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर यदुवंशी उपाध्यक्ष चित्रलेखा इठोले, माता पालक संघ अध्यक्ष डूडेश्वर गहाणे यासह ग्रामपंचायत पदाधिकारी तथा शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले सोबतच गावांमधून शोभायात्रा काढण्यात आली गोड जेवण देऊन कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संदीप तिडके, पदवीधर विषय शिक्षिका वर्षा वालदे, सहाय्यक शिक्षक वसंत नाईक, जोहनलाल मलगाम शितल खाडे, वैशाली बडे, वैशाली सोनवाने ,विद्या बिंझलेकर, मायाताई उईके, अरुणा मेश्राम यासह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले