41.3 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home शैक्षणिक सटवा येथे भजन कीर्तनासह वाजतगाजत जेसीबी मधून करण्यात आले नवागतांचे स्वागत

सटवा येथे भजन कीर्तनासह वाजतगाजत जेसीबी मधून करण्यात आले नवागतांचे स्वागत

0
247

blank

गोरेगांव – तालुक्यातील सटवा येथे आज २३ जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी भजन किर्तनासह डफलीच्या आवाजात वाजतगाजत प्रभातफेरी काढून जेसीबी मध्ये बसवून नवागताचे स्वागत करण्यात आले.
जिल्ह्यात शाळेची घंटा आज २३ जून रोजी वाजली. वरिष्ठ पातळीवरूनही नवागताचे स्वागत करून शाळा प्रवेशोत्सव करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच अर्चना रमेश ठाकूर, पोलिस पाटील टिकाराम रहांगडाले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र रहांगडाले, तंटामुक्त समिती अध्यक्ष रवींद्र कटरे, उपसरपंच विनोद पारधी, माजी सरपंच रमेश ठाकूर, मुख्याध्यापक त्रिलोक चौधरी यांच्या नेतृत्वात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. सर्व नवागताचे स्वागत करून त्यांना जेसीबी मध्ये बसवून गाव भ्रमंती करण्यात आली. यावेळी पारंपरिक वाद्य डफली सह भजन कीर्तनाच्या माध्यमातून शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ओमेंद्र ठाकूर, संजय कटरे, गणराज रहांगडाले, तेजराम रहांगडाले, राजेंद्र ठाकूर, दिलीप रहांगडाले, भागवत बिसेन, सुखराम ठाकूर, नत्थु रहांगडाले, कपूरचंद पारधी, गिरधारी कोल्हे, नानू रहांगडाले, नानाजी रहांगडाले, अंबर चौधरी, गोधन बाई कटरे, संजय रहांगडाले, सहायक शिक्षक रूपेश बिसेन यांच्यासह गावातील इतर नागरिक, पालक मंडळी व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.