23.9 C
Gondiā
Monday, August 24, 2026
Home शैक्षणिक ९ जुर्लेपासून जि.प.च्या सर्व शाळा सकाळ पाळीत

९ जुर्लेपासून जि.प.च्या सर्व शाळा सकाळ पाळीत

0
196
file photo

गोंदिया,दि.९ः एकीकडे ९ जुलै पासून ३० जुर्लपर्यंत जिल्हा परिषदेच्या (जि.प.) शाळा सकाळच्या पाळीत भरण्याविण्याचे आदेश शिक्षण मंडळाचे सचिवांनी दिले आहेत.सोबतच ९ जुर्लेच्या संपात सहभागी होणार्या सर्व शिक्षक मुख्याध्यापकांचे वेतन कपात करण्याच्याही सुचना दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी, ९ जुलै रोजी राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (TET) नियम, अशैक्षणिक कामे (BLO ड्युटी), संचमान्यता धोरण आणि पदोन्नती प्रक्रियेतील त्रुटींचा निषेध करण्यासाठी शिक्षकांनी सामूहिक रजेचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, मुख्याध्यापक संघ आणि इतर अनेक समविचारी संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

विशेष म्हणजे भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या बीएलओ कामाकरीता शिक्षकांची मोठ्या संख्येने नियुक्ती करण्यात आल्याने त्यांना ती कामे करता यावे,याकरीता जिल्हा परिषदेच्य सर्व शाळा सकाळ पाळीत सकाळी ७:०० ते दुपारी ०१:०० यावेळेत तसेच दोन पाळीत शाळा भरत असलेल्या शाळेच्या ठिकाणी दुसरे सत्र हे दुपारी १२:३० पासून सुरु करण्याचे आदेश काढण्यात आले आहे.