
सालेकसा,दि.04ःःप्रतिवर्षानुसार यावर्षी सुद्धा दि बुद्धिष्ट इंटरनेशनल स्कूल साकरीटोला ता. सालेकसाच्यावतीने शालेय वार्षिकोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्धघाटन जि.प.महिला व बालकल्याण सभापति लताताई दोनोडे यांच्या अध्यक्षतेखाली, डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते पार पडले. दिपप्रज्वलन तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथि म्हणुन माजी प.स.सदस्या संगीताताई शहारे, गोंदिया न.प.अधिकारी मोहित राजनकर, माजी सैनिक शैलेश वालदे, शिक्षक धनराज दहिलकर, अजय विधामंदिरचे मुख्याध्यापक टी.जी. ठाकरे, शांति निकेतन कान्वेंटच्या मुख्याध्यापिका स्वाती बावनकर, संस्थेचे संचालक भारत शहारे उपस्थित होते.अतिथिनी उपस्थितiना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना बालवयातच शालेय पाठ्यक्रमासोबतच आई वडिलांचे उपकार व संस्काराची प्राथमिक स्वरूपाची माहिती करुण द्यावे असे मत व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्तावीक वाचन भारत शहारे यांनी केले.संचालन शिक्षिका सुजाता गजभिये यांनी, तर उपस्थिताचे आभार शिक्षिका कु. रागिनी खोटेले यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी स्वपना शहारे,अनिशा इंदुरकर,मनीषा दोनोडे, ज्योती शहारे, इन्द्रराज मड़ावी, संदीप टेकाम, विद्यार्थी प्रमुख अवनी साखरे, प्रत्युष शंभरकर, यांनी परिश्रम घेतले.