चुलोद येथील कदमांच्या शेतात आढळले हरणाचे पिल्लू

0
31
गोंदिया,दि.04ः- तालुक्यातील चुलोद येथील दिपक कदम यांच्या शेतात 3 फेबुवारीला हरणाने पिल्लूला जन्माला घालून निघून गेल्याची घटना समोर आली.2 दिवसापर्यंत हरणाचे पिल्लू हे शेतातच असल्याचे कदम यांच्या शेतात काम करणारे धर्मराज  मचाडे व कंसुला मचाडे यांना दिसताच त्यांनी त्या पिल्लूला ताब्यात घेत पाणी पाजले.आणि सदर माहिती शेतमालक दिपक कदम यांना दिली.कदम यांनी लगेच वनपरिक्षेत्राधिकारी नंदनवते व अरुण साबळे यांना भ्रमणध्वनीवरुन माहिती दिल्यानंत अरुण साबळे यांनी शेत गाठून सदर पिल्लू ताब्यात घेतले.