Home शैक्षणिक आरटीई प्रवेशात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल

आरटीई प्रवेशात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल

0

गोंदिया,दि.१४ : आरटीई प्रवेशाची पहिली फेरी पार पडली असून गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. गोंदियामधील ७८.९८ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत.राज्यातील ३५ जिल्ह्यातील ९ हजार १९५ शाळांमध्ये एक लाख १६ हजार ७७९ जागा आरटीईसाठी राखीव करण्यात आल्या आहे. या जागांसाठी दोन लाख, ४४ हजार ९३५ विद्याथ्र्यांनी अर्ज केले होते. पहिल्या सोडतीनंतर ४४ हजार, ९८३ विद्याथ्र्यांनी पुढील सत्रासाठी प्रवेश घेतले.
गोंदिया जिल्ह्याच्या १४१ शाळांमध्ये १०४३ जागांसाठी प्रवेश द्यायचा होता. या जागांसाठी २ हजार ७३१ अर्ज आले. यातील ६०५ विद्याथ्र्यांनी प्रवेश घेतला. त्या पाठोपाठ पालघर ७५.७७ टक्के धुळे ७४.९४, सोलापूर ७४.८६, सातारा ७३.६३, वर्धा ७२.९०, अहमदनगर ७२.६२, अकोला ७२.४९, भंडारा ६९.७५, बुलढाणा ६९.४८, मुंबई ६९.०४, नाशिक ६८.९२, पुणे ६८.६४, जलगाव ६८.५४, रायगड ६८.३६, अमरावती ६७.५२, नांदेड ६७.०५, जालना ६६.८०, बिड ६६.७३, ठाणे ६५.३५, नागपूर ६५.१५, चंद्रपूर ६४.०४, रत्नागिरी ६३.३३, लातूर ६३.१८, औरंगाबाद ६१.४७, उस्मानाबाद ६१.१५, यवतमाळ ६०.७३, वाशिम ६०.०४, मुंबई ५९.३४, परभणी ५९.०९, गडचिरोली ५८.६३, सिंधुदुर्ग ५६.३८, नंदूरबार ५५.७१, हिंगोली ५४.४६, कोल्हापूर ५० आणि सांगली जिल्ह्यात ४५.४२ टक्के बालकांनी आतापर्यंत आरटीईअंतर्गत प्रवेश घेतले आहेत.
पहिल्या फेरीत राज्यातील ६७ हजार ७०६ विद्याथ्र्यांची निवड झाली होती. परंतु त्यातील ४४ हजार ९८३ विद्याथ्र्यांचा प्रवेश निश्चीत झाला आहे. राज्यातील ६६.४४ टक्के बालकांचे प्रवेश झाले आहेत.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

Exit mobile version