गोरेगाव,दि.16ः-मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगाव येथे बालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक आर. डी. कटरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती छाया मेश्राम उपस्थित होत्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी विध्यार्थ्यांनी भाषण तसेच गीत सादर केले. अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना बालक दिनाचे महत्व पटवून दिले.तसेच पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जिवंनचरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष कोल्हे यांनी केले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
किरसान मिशन मध्ये बालक दिन साजरा
गोरेगाव- स्थानिक किरसान मिशन स्कूल व ज्युनियर कॉलेज इथे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जंयती बालक दिवस म्हणून साजरी करण्यात आली. हयावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विनोद उके यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून बालक दिवसाचे महत्व सांगितले पंडीत नेहरू यांनी बालकांना राष्टाचे भवितव्य असल्यामुळे त्यांची जोपासना शिक्षण व आरोंग्य याविषयी जागरूक राहण्यास सांगितले त्याचप्रमाणे बालदिवस, बालअधिकार संरक्षण व बालमजुरी यावर लक्ष देण्याची काळाची गरज आहे. असे डॉ. उके यांनी सांगितले.
यावेळी शाळेतील शिक्षिका. श्रीमती. गीता जगनींत, छाया हरिणखेडे, ममता चौधरी, माधुरी बघेले, सरिता चिपे, मीरा साठवणे, लक्ष्मी चौरेशिया पुष्पलता सोनवणे, सुनील रहांगडाले, केशव मेश्राम, माधुरी गोदुले, ज्ञानेश्वरी पटले, सुभाष चुलपार, सचिन रामटेके, धर्मेन्द्र राऊत, केशव ठाकरे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
खमारी जि.प.शाळेत बालदिवस 
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा हलबीटोला खमारी येथे १४ नोव्हेंबरला बाल दिवस तर 15 नोव्हेंबरला भारताचे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरा करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सौ.यशोधरा सोनेवाने होत्या. प्रमुख अतिथी सचिन राऊत, शोभा फंदे, जयश्री तरोणे तसेच मानकर, हिना खोब्रागडे उपस्थित होते.यावेळी स्वातंत्र्यवीराच्या कार्याला उजाळा दिला. निबंध व भाषण स्पर्धा घेण्यात आली . सर्व बालकाना गोड पदार्थ देऊन बिरसा मुंडा जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आले. प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
किरसान मिशन मध्ये बिरसा मुंडा जंयती
गोरेगाव-स्थानिक किरसान मिशन स्कूल व जुनियर कॉलेज गोरेगाव इथे भगवान बिरसा मुंडा जंयती उत्सहाने साजरी करण्यात आली. ह्यावेळी प्राचार्य डॉ. विनोद उके, यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून बिरसा मुंडा महान क्रांतीकारक व आदिवासी लोकांचे उद्धारक होऊन गेले. ब्रिटिश काळात आदिवासी समाजातील होणाऱ्या अन्यायावर व त्याचा शैक्षणिक, आर्थिक, व सामाजिक लढ्यासाठी शौर्याने कार्य केले. ह्यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये श्री. सुभाष चुलपार, व शाळेतील शिक्षिका छाया हरिणखेडे, ममता चौधरी, मंगला जांभूळकर, माधुरी बघेले, सरिता चोपे, मीज्ञानेश्वरी पटलेरा बिसेन, लक्ष्मी चौरसिया, पुष्पलता सोनवणे, माधुरी गोधुले, गोदावरी डोहळे, ज्ञानेशोरी पटले, सुनील रहांगडाले, प्रमोद रहांगडाले, सचिन रामटेके, धर्मेंद्र राऊत, उपस्थित होते.मोहगाव(बु.)येथील परशुराम विद्यालयात बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात बिरसा मुंडा यांना अभिवादन
वाशिम : बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक तथा तहसीलदार प्रशांत जाधव, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी
गडचिरोली,: स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी श्री. भांडारकर, तहसिलदार (आस्थापना), निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार सुनिल चडगुलवार, श्री. येरमे, ङिके. निकुरे, श्री. सोरते, श्री.दुधबळे, श्री. कोल्हटकर, श्री. मेश्राम, आदि. कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.उपस्थित सर्व कर्मचारी, अधिकारी वृंदानी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.




