एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल प्रवेश परीक्षा रद्द

मागील सत्रातील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या निवड होणार

0
199

वाशिम, दि. ०७ (जिमाका) : आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठीची परीक्षा कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा ऑनलाईन होणार होती; परंतु, आता ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.  प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील वाशिम, अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालीका प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये ५ वी, ६ वी, ७ वी, ८ वी व ९ वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीच्या  ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत, त्यांच्या मागील सत्रातील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड होणार आहे.

   सहाव्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेचे अर्ज भरले आहे त्यांनी आता पाचव्या वर्गातील प्रथम सत्राचे गुण भरण्याचे निर्देश शासनाकडुन दिले आहे. हाच निष्कष ७ वी, ८ वी व ९ वी रिक्त जागेवरील प्रवेशासाठीही लागू करण्यात आलेला आहे. मागील सत्रातील एकंदर ९०० पैकी विद्यार्थ्यांनी किती गुण मिळविले त्याआधारे निवड यादी जाहीर केली जाणार आहे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या गुणाऐवजी श्रेणी भरलेली स्वीकृत केली जाणार नाही यांची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांच्या अर्ज भरतेवेळी आवेदन पत्रामध्ये दिलेला संपर्क अथवा मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची जन्म तारीख आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या मागील इयत्तेच्या प्रथम सत्राच्या गुणपत्रिकेची प्रत आवश्यक आहे. (स्कॅन केलेली गुणपत्रेकेची प्रत पीएनजी, जेपीएजी, जेपीजी, पीडीएफ स्वरुपात असावी.) शाळेतील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरलेले असतील, तर प्रत्येक विदयार्थ्यांची माहिती स्वतंत्र भरावी तसेच गुणपत्रक स्वतंत्र अपलोड करावे.

आवेदनपत्र भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी किंवा संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांनी विदयार्थ्यांचे गुण mtpss.org.in या लिंकवर भरावेत. त्याकरिता मुख्याध्यापक यांनी संबंधीत विद्यार्थ्यांचे प्रथम सत्राचे गुण ९०० पैकी गुण नोंदवायचे आहे. (मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, कला, क्रिडा व कार्यानुभव असे एकुण ९ विषय) वर्ग १ ली ते ८ वी च्या विदयार्थ्यांना देण्यात येणा-या प्रगती पुस्तकामध्ये श्रेणी देण्यात येते. त्यामुळे सर्व संबंधीत विद्यार्थ्यांचे त्यांच्या शाळेकडुन गुण प्राप्त करुन मुख्याध्यापकांनी लिंकमध्ये १५ सप्टेबर, २०२० पर्यत भरावयाचे आहेत, असे प्रकल्प अधिकारी यांनी कळवीले आहे.