इतर मागासवर्गीय महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा

थेट कर्ज योजना; वैयक्तिक कर्ज व्याज परवाना योजना ;l बीज भांडवल योजना ; गट कर्ज व्याज परतावा योजना

0
73

भंडारा दि.22 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीने इतर मागसवर्गीय प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना स्वयंरोजगार मिळण्याकरिता शासनाच्या विविध योजना राबविल्या जात असून या योजनांचा जिल्हयातील युवक युवतींनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

थेट कर्ज योजना : रूपये एक लक्ष थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करतांना जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, प्रकल्प अहवाल, यासारख्या कागदपत्राची आवश्यकता लागणार आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना : इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व कुशल व्यावसायिक व्यक्तींना कृषी सलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु उद्योग व मध्यम उद्योग, उत्पादन व्यापार व विक्री तसेच सेवा क्षेत्र इत्यादी व्यवसायाकरिता या योजनेत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

गट कर्ज व्याज परतावा योजना : महामंडळाच्या निकषानुसार विहित केलेल्या निकषांनुसार वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्था बँकेतर्फे स्वयंरोजगार, उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळकडून अदा करण्याची ही योजना आहे.

बीज भांडवल योजना : इतर मागसवर्गीय प्रवर्गातील पात्र व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँक व अग्रणी पुरस्कृत केलेल्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणारी ही योजना आहे. यात बँकेचा सहभाग 75 टक्के, राज्य महामंडहाचा सहभाग 20 टक्के व लाभार्थी सहभाग 5 टक्के असतो. या सर्व योजनांच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ सामाजिक न्याय भवन भंडारा या कार्यालयाशी संपर्क साधावा व योजनांचा लाभ घ्यावा.

000