गोंदिया, दि. 10 : लार्सन अँड टुब्रो लिमिटेड, एल अँन्उ टी कन्सट्रक्शन बिल्डींग ॲन्ड फॅक्टरी पनवेल या कंपनीचे अधिकारी त्यांच्या कंपनीची माहिती अटी, शर्ती, सुविधा बाबतची माहिती देवून उमेदवारांचा प्रमाणपत्रे तपासून औधोगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया येथे 16 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष मुलाखती घेण्याचे आयोजन केलेला आहे. सदरील मुलाखती मध्ये प्रशिक्षण घेत असलेले तसेच प्रशिक्षण पूर्ण झालेल्या 18 वर्ष वय पूर्ण झालेले सुतारकाम (कारपेंटरी), बांधकाम (मेसन), ईलेक्ट्रिकल, वायरमन, वेल्डर या व्यवसायातील उमेदवारांची मुलाखती घेणार आहे.
तरी इच्छुक असलेल्या नमूद व्यवसायातील उमेदवारांनी स्वखर्चाने आवश्यक कागदपत्रासह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया येथे दिनांक 16 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता जास्तीत जास्त प्रमाणात अनुषंगीक सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया यांनी कळविले आहे.