
प्रवेश घेण्याचे आवाहन
गोंदिया : १६ ते १९ वयोगटातील कमीत कमी १० वी उत्तीर्ण महिला व युवतींकरीता दोन वर्षीय डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सीलंसचे दोन वर्षाचे निवासी प्रशिक्षण पुणे येथे घेण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण निशुल्क असून होतकरू महिला व युवतींनी ७ ऑगस्टपर्यंत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.
सदर प्रशिक्षणाची वैशिष्ठ्ये पुढील प्रमाणे- प्रशिक्षणामध्ये उत्पादनाची गुणवत्ता, देखभाल, पुरवठा साखळी, माहिती व तंत्रज्ञान, औद्योगीक सुरक्षा, कार्य संस्कृती, टीमवर्क व संवाद कौशल्य याबाबतचे प्रशिक्षण प्रशिक्षीत व तज्ञ प्रशिक्षकांकडून देण्यात येईल. प्रशिक्षण कालावधी दोन वर्ष, प्रशिक्षण निःशुल्क असुन प्रशिक्षणाचे वेळी निवास व भोजन व्यवस्था, मेडीकल इन्श्युरन्स, युनीफार्म, किरकोळ खर्च निःशुल्क असणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक महिला व युवतींनी ७ ऑगस्ट २०२२ पर्यंत नोंदणी करुन आपला सहभाग नोंदवावा. तसेच प्रवेश घेण्यासाठी, प्रवेश फार्म उपलब्ध करुन घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत, दुसरा माळा, रुम नं. २१०, आमगांव रोड, गोंदिया- ४४१६०१, दुरध्वनी क्र. ०७१८२-२९९१५० किंवा ९५८८४६७३९३ / ९६९९१७९६८० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा कार्यालयात संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन केले आहे. (नोंदणीकरीता नोंदणी फॉर्म ९५८८४६७३९३ /९६९९१७९६८० या क्रमांकावरुन उपलब्ध करुन देण्यात येईल.)




