
गोंदिया,दि.19 : कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम-2005 नुसार कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर संरक्षण अधिकारी कनिष्ठ यांचे अभय केंद्र कार्यालय कार्यान्वित आहेत. महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गोंदिया अंतर्गत तालुकास्तरावरील अभय केंद्र कार्यालयात जिल्ह्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी उमेदवारांकडून 8 सहाय्यक व 8 डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची अकरा महिने कालावधीकरीता कंत्राटी तत्त्वावर पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदर पदांची सविस्तर माहिती व अर्ज www.gondia.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2022 या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पात्र अंशकालीन पदवीधर उमेदवारांनी वरील संकेतस्थळावरुन अर्ज डाऊनलोड करुन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, तिसरा माळा, रुम नं.36, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे दिनांक 1 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनीकर यांनी केले आहे.