महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचा दुसरा टप्पा 13 ऑक्टोबरला

0
11

गोंदिया, दि. 04 : राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मुर्त स्वरूप देण्यासाठी तसेच राज्यातील उद्योजकता व नाविन्यपुर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी आयोजीत करण्यांत आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचा प्रचार व प्रबोधनाचा पहिला टप्पा यशस्विरित्या पार पडलेला आहे. सदर यात्रेचा दुसरा टप्पा, जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्र गुरुवार 13 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 9.30 वा पासुन शासकीय तंत्रनिकेतन, फुलचुर गोंदिया येथे आयोजीत करण्यांत आलेला आहे.

           सादरीकरण सत्रात जिल्हास्तरावर प्रथम पारितोषिक रु.25 हजार, द्वितीय पारितोषिक                   रु. 15 हजार व तृतीय पारितोषिक रु.10 हजार देण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरावर कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलीटी (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा इ.), ई-प्रशासन, स्मार्ट पायाभुत सुविधा आणि गतिशिलता या प्रत्येक क्षेत्रांत सर्वोत्कृष्ट महिला उद्योजीका रु. 1 लाख तसेच पहिले पारितोषिक                 रु. 1 लाख व द्वितीय पारितोषिक रु.75 हजार देण्यांत येणार आहे. तसेच विजेत्यांना रोख अनुदान तसेच इनक्युबेशन सहाय्य, बीज भांडवल निधीसाठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शक सत्रे तसेच सॉफ्टवेअर क्रेडिट्स, क्लाऊड क्रेडिट्स सारखे इतर लाभही पुरविण्यांत येतील.

           सादरीकरण सत्रात जिल्ह्यातील जास्तीतजास्त विद्यार्थी व नवउद्योजक यांनी सहभाग नोंदवावा. तसेच याबाबत अधिक माहितीकरीता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या संकेतस्थळावर किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत, दुसरा माळा, रुम नं. 210, आमगांव रोड, गोंदिया-441601, दुरध्वनी क्र. 07182-299150 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा कार्यालयांत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे व सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास राजू माटे  यांनी केले आहे.