किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत सर्व प्रवर्गातील युवक-युवतींना नि:शुल्क प्रशिक्षण

0
167

      गोंदिया, दि.2 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया कार्यालयामार्फत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2022-23 अंतर्गत ‘किमान कौशल्य विकास कार्यक्रम’ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील सर्व प्रवर्गातील युवक-युवतींना नि:शुल्क प्रशिक्षणाची तथा रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली माहिती https://forms.gle/5UyHjCPFSGKV3SzXA या लिंकवर भरावी. उमेदवारांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र व नोकरीची संधी संबंधीत प्रशिक्षण संस्थेकडून उपलब्ध करुन देण्यात येईल.

         तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर नोंदणी करुन आपला सहभाग नोंदवावा. तसेच याबाबत अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत, दुसरा माळा, रुम नं.210, आमगाव रोड, गोंदिया येथे प्रत्यक्ष भेटावे अथवा 07182-299150 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन राजु माटे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया यांनी केले आहे.