मोबाईल रिपेयरिंगचे प्रशिक्षण ग्रामीण भागातील तरुणांना संधी : अर्ज मागविले

0
15

 गोंदिया, दि.17 : बँक ऑफ इंडिया आरसेटी तर्फे देशात वाढत्या बेरोजगारी, सुशिक्षीत बेरोजगारांची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या च्या दृष्टिकोणातून ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र राज्य ग्रामीनोन्नती अभियान (उमेद) व माविम यांनी देशातील प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) सुरु केल्या आहेत. ज्या जिल्ह्यात ज्या प्रमुख बँक आहे त्यांच्याकडे अशा आरसेटी चालविण्याची जबाबदारी सोपवण्यात येते. गोंदिया जिल्ह्यात बँक ऑफ इंडिया ही अग्रणी बँक आहे म्हणून जिल्ह्यात बँक ऑफ इंडिया आरसेटी चालवत आहे. स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगार करता यावा या उद्देशाने विविध प्रकारचे नि:शुल्क प्रशिक्षण देत असून ही संस्था गोंदिया जिल्ह्यात 21 जानेवारी 2011 पासून कार्यरत असून आतापर्यंत 7131 पेक्षा जास्त बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षण दिले आहे. त्यापैकी 4948 व्यक्तींनी स्वत:चा रोजगार सुरु केला आहे.

         बँक ऑफ इंडिया (आरसेटी) स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था येथे निवासी 30 दिवशीय मोबाईल रिपेयरिंग या व्यवसायाचे प्रशिक्षण 19 एप्रिल 2023 पासून सुरु करीत आहे. परंतू त्यासाठी आरसेटीला कोर्स सुरु करण्याकरिता कमीत कमी 30 ते 35 उमेदवारांची गरज असते. त्याकरीता गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील बेरोजगार सुशिक्षीत व्यक्तींनी मोबाईल रिपेयरिंग या प्रशिक्षणाकरीता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

         तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन पत्र निदेशक, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान, वाहणे पॅलेस, हरिणखेडे पेट्रोलपंपच्या जवळ, तिरोडा रोड, कुडवा (गोंदिया) येथे अर्ज करावा, असे आरसेटीचे निदेशक राहुल गणवीर यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी 07182-252007 अथवा भ्रमणध्वनी 9403359907 यावर संपर्क साधावा.