. २५ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार
गोंदिया, दि.4 : जिल्हा परिषद गोंदियाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गामधील ३३९ रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद गोंदियाच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागामधील ही पदे आहेत, त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरीता जाहिरात देण्यात आली आहे. गट-क मधील विविध संवर्गाची एकूण ३३९ पदांकरीता अर्ज करण्याचा कालावधी ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर २५ ऑगस्ट २०२३ रोजीचे रात्री 23.59 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
वरील पदभरतीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जिल्हा परिषद गोंदियाच्या WWW.ZPGONDIA.GOV.IN या लिंकवर पाहण्यास उपलब्ध आहे. अधिक माहिती व मदतीकरिता 07182-236155, भ्रमणध्वनी क्रमांक 9975100202, 8007682603 यावर संपर्क साधावा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.