प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा

0
14

गोंदिया, दि.12 : तालुका कृषी अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या वतीने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना पीएमएफएमई सन 2023-24 पंधरवडा अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया यांच्या कार्यालयातील सभागृहात 9 ऑगस्टला घेण्यात आली.

        यावेळी रोशन पंचबुद्धे, लीड बँक मॅनेजर बँक ऑफ इंडिया गोंदिया यांनी प्रक्रिया उद्योग संदर्भात बँकेतील प्रोसीजर तसेच प्रस्ताव कोणत्या कारणाने रद्द होतात, बँक लोन बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

        तालुका कृषी अधिकारी राजेश पवार यांनी पीएमएफएमई अर्ज प्रक्रिया, यामध्ये कोणते उद्योग करू शकतो, येणाऱ्या अडचणी बाबत उपस्थित लाभार्थी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच पौष्टिक तृणधान्य त्यांचे आहारातील महत्त्व व त्याचा आपल्या प्रक्रिया उद्योगामध्ये कसा उपयोग करून घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले.

       ओकेश नान्हे यांनी अर्ज करतांना लागणारे कागदपत्रे व उद्योगाबाबत माहिती दिली. सी.बी. देवीपुत्र जिल्हा ग्राम उद्योग अधिकारी गोंदिया यांनी मधुमक्षिका पालन उद्योग बाबत माहिती दिली.

       पीएमएफएमई योजने अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी भागचंद बोपचे रा. परसवाडा यांनी त्यांनी सुरू केलेल्या तेल घाणी उद्योगाबाबत माहिती दिली. कार्यक्रमास  मंडळ कृषी अधिकारी वैशाली वानखडे, कृषी अधिकारी मुनेश्वर ठाकूर, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व क्षेत्रीय कर्मचारी, सदर योजनेअंतर्गत काम करणारे डीआरपी व योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छित असलेले सर्व शेतकरी उपस्थित होते.

         कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार जितेंद्र मेंढे यांनी मानले. पीएमएफएमई योजने अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेश पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.