राजीव गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तिरोडा येथे तलाठी भरती परीक्षेचे आयोजन

0
7

 परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू

      गोंदिया, दि.16 : तलाठी भरती परीक्षा-2023 ही परीक्षा दिनांक 17, 18, 19, 20, 21, 22, 26, 27, 28, 29, 31 ऑगस्ट 2023 आणि दिनांक 1, 4, 5, 6, 8, 10, 13, 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत तीन सत्रात होणार असून सत्र क्र.1- सकाळी 9 ते 11, सत्र क्र.2- दुपारी 12.30 ते 2.30 आणि सत्र क्र.3- दुपारी 4.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत घेण्याचे निश्चित  करण्यात आले आहे. सदर परीक्षा राजीव गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्नेहल टॉकीजच्या समोर, तलाव रोड, तिरोडा या केंद्रावर घेण्यात येणार आहे.

        या परीक्षे दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने दिनांक 17, 18, 19, 20, 21, 22, 26, 27, 28, 29, 31 ऑगस्ट 2023 आणि दिनांक 1, 4, 5, 6, 8, 10, 13, 14 सप्टेंबर 2023 रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी गोंदिया यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन तलाठी भरती परीक्षा-2023 संदर्भात परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान दिनांक 17, 18, 19, 20, 21, 22, 26, 27, 28, 29, 31 ऑगस्ट 2023 आणि दिनांक 1, 4, 5, 6, 8, 10, 13, 14 सप्टेंबर 2023 रोजी कोणासही कसल्याही प्रकारचे अस्त्र, शस्त्र व कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे- कॅल्क्युलेटर, मोबाईल, लॅपटॉप, पेजर, फॅक्स मशीन, झेरॉक्स मशीन इत्यादींचा वापर किंवा जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

        हा आदेश तलाठी भरती परीक्षा-2023 चे परीक्षार्थी, परीक्षेच्या कामावर नियुक्त असलेले अधिकारी व कर्मचारी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशास लागू राहणार नाही.

      सदर आदेश दिनांक 17, 18, 19, 20, 21, 22, 26, 27, 28, 29, 31 ऑगस्ट 2023 आणि दिनांक 1, 4, 5, 6, 8, 10, 13, 14 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 6.30 वाजेपासून ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी कळविले आहे.