किमान वेतन न देणार्‍या हिंदुस्थान कंपोझिट कंपनीवर कार्यवाहि करा-अजय मेश्राम

0
8
वाढदिवसाच्या शुभेच्छा

भंडारा।२7 सप्टेंबर=मागील ६ वर्षापासून एन.आय.डी.सी राजेगाव येथील स्थित असलेल्या हिंदुस्तान कंपोझिट कंपनी मध्ये  वेगवेगळ्या पदावर कार्यरत असलेल्या  २२ कामगारांना कंपनीने नियमानुसार किमान वेतन न देता अत्य अल्प वेतनावर काम करायला भाग पडल्यामुळे त्यांची आर्थिक पिठवणुक करणार्‍या हिंदुस्थान कंपोझिट कंपनीवर कार्यवाहि करण्याची मागणी सामाजीक कार्यकर्ते अजय मेश्राम यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाच्या वतीने मागणी करण्यात आली आहेत.
या कंपनीतले कामगारांनी आयुक्त कार्यालयाकडे धाव घेतली होती. त्यानी किमान वेतना करिता सर्व्हे केला होता. परंतु त्या सर्व्हे नुसार कामगार आयुक्तांनी पुढील कोणतीही कारवाई न केल्याने  हे २२ कामगारांना किमान वेतन पासून वंचित राहावे लागत असल्याने त्यांची आर्थीक पिळवणूक होत असल्याने जिल्हाधिकारी यांनी सर्व २२ कामगारांचे शिस्ट मंडळांनी सामाजीक कार्यकर्ते अजय मेश्राम यांच्या मागदर्शनात जिल्हाधिकारी यांना निवेदनाच्या वतीने कामारांची दैनिय अवस्थे बद्दल माहीती देण्यात आली व त्या २२ कामगारांना लवकरात लवकर किमान वेतन लागू करण्याची मागणी अजय मेश्राम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली सोबतच कायद्याला न जूमानार्‍या  हिंदुस्तान कंपोझिट कंपनीच्या व्यवस्थापनावर देखील कडक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली .मागणी पुर्ण न झाल्यास सर्व २२ कामगारांनी उपोषणाचा प्रवित्रा घेतला असून जिल्हाधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला इशारा देखील देण्यात आले. निवेदन देतेवेळीस सामाजीक कार्यकर्ते अजय मेश्रमा, सचीन मेश्राम, सुरज निर्बोते,सुरज दुबे, अतुल चोपकर,समिर मस्के, अमित खेडीकर,मनोज दारवाटे,मुकेश कोल्हे,श्रीधर  भोयर, सुरज टेभुर्ण,मंगेश गिदनारे,संजय हटवार,वासुदेव राखडे, सेवक तुरस्कर,ईश्वर लोदासे, प्रशांत बांते, अविनाश झलपुरे, भुषण नवलकर,फौजान पठान, अतुल कुंभलकर, नितेश शेंडे, हर्षल विजय मेश्राम,सोनु खोत तसेच इतर कामगार उपस्थित होते.