32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home रोजगार/व्यापार पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 126 उमेदवारांची प्राथमिक निवड

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 126 उमेदवारांची प्राथमिक निवड

0
88

blank

गोंदिया, दि.23 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया, शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने दि.22 जुलै 2025 रोजी शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या रोजगार मेळाव्यामध्ये प्रत्यक्ष एकूण 207 उमेदवार उपस्थित होते. यामधून एकूण 126 उमेदवारांची प्राथमिक निवडही करण्यात आली.

       सदर रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील नामवंत 16 कंपन्या उपस्थित होत्या. संबंधित कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनी रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित उमेदवारांना रोजगाराबाबत मार्गदर्शन केले. तसेच शासकीय तंत्रनिकेतनचे प्राध्यापक पी.आर.रामटेके यांनी करिअर विषयक मार्गदर्शन केले. रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. त्याचवेळी 126 उमेदवारांची प्राथमिक निवडही करण्यात आली.

        पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य सी.डी.गोळघाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त रा.ना.माटे, विविध कंपन्यांचे पदाधिकारी, तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया व शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मो. निसार अ. सलाम यांनी केले.

blank