पारधी समाजातील युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची संधी

१६ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0
81

वाशिम, दि. ०६ : अकोला येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यक्षेत्रातील वाशिम जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना २०१९-२० अंतर्गत निधीतून पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत पारधी समाजातील युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी इच्छुक, पात्र युवक-युवतींनी ११ मार्च ते १६ मार्च २०२० या कालावधीत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला या कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना २०१९-२० अंतर्गत आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी पारधी समाजातील किमान १२ वी पास असणाऱ्या ४० युवक-युवतींची निवड करण्यात येणार आहे. तरी वाशिम जिल्ह्यातील पारधी समाजातील युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी केले आहे.