गोंदिया, दि. २२ : गर्भवती महिला प्रसूती वेदनांनी विव्हळत होती. नातेवाईक विनवणी करीत होते. तरीही बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील डॉक्टरांना पाझर फुटला नाही. कानोकानची ही वार्ता येथील लायन्स कोरोना हेल्प केअर ग्रुपवर पोहोचली. या ग्रुपच्या सदस्यांनी धाव घेत मातेची मदत केली अन् या मातेने सोमवारी (दि.२१) रात्री साडेबाराच्या सुमारास गोंडस बाळाला जन्म दिला.
याचे झाले असे की, आमगाव येथील करोना बाधित गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी तिच्या नातेवाइकांना सोमवारी येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात आणले. बराच वेळ होऊनही कार्यरत डॉक्टर तिच्या प्रकृतीकडे किंबहुना तिच्यावर औषधोपचार करण्याकडे लक्ष देत नव्हते. उल्लेखनीय म्हणजे, कार्यरत डॉक्टर आपली जबाबदारी झटकून रजेगाव येथील आरोग्य उपकेंद्र किंवा नागपूरला हलविण्याचा नेहमी सल्ला देत असतात. या महिलेच्या नातेवाइकांच्या बाबतीतही तसेच घडले.
प्रसूती वेदनांनी विव्हळत असलेल्या या मातेला रजेगावच्या रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, तिथे गेल्यानंतर तिला नागपूरला हलविण्याचा सल्ला देत गेटवरच थांबवून ठेवण्यात आले.
ही बाब सायंकाळी साडेचारच्या सुमारास लायन्स कोरोना हेल्प केअर या ग्रुपवर पडली आणि लागलीच सुजाता बहेकार, प्रल्हाद सार्वे, विवेक अरोरा यांनी मदतीसाठी धाव घेतली. याची कल्पना नगरसेवक कल्लू यादव यांना दिली. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यानुसार, त्या मातेला रजेगाव येथून पुन्हा गोंदियाच्या केटीएस रुग्णालयात भरती करण्यात आले. प्रसुतीकळा सुरू झाल्याने तिला बाई गंगाबाई ‘हिला रुग्णालयात नेण्यात आले. रात्री साडेबाराच्या सुमारास मातेने गोंडस बाळाला जन्म दिला.
लायन्स कोरोना हेल्प केअर ग्रुपचे प्रतीक कदम, मनोज दुर्गानी, प्रल्हाद सार्वे, विवेक अरोरा, सुजाता बहेकार, माहोरे, संतोष कायते, डॉ. गौरव बग्गा यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.