रुग्णसेवा करणारी प्रथम महाराष्ट्रीय महिला डॉक्टर: डॉ रखमाबाई राउत यांची आज जयंती.

:- सचिन चौधरी, अमरावती

0
191

भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशी यांचे नाव घेतले जाते. वैद्यकीय क्षेत्रातील चांगले काम करणा-या व्यक्तींना महाराष्ट्र शासन त्यांचे नावाने दरवर्षी पुरस्कार सुद्धा देतं. चांगली बाब आहे ही. पण नेमकी परिस्थिती काय आहे ते आपण तपासुया.
आनंदीबाईंचा जन्म ३१-३-१८६५ चा. त्या दि. ११-३-१८८६ ला अमेरिकेत डॉक्टर झाल्या. भारतात वर्ष १८८६ च्या शेवटी शेवटी परत आल्या. भारतात परत येतानाच त्यांना टीबी हा त्यावेळेसचा जीवघेणा आजार झाला. अवघ्या ३-४ महिन्याच्या आजारात त्या २६-२-१८८७ ला मृत्युमुखी पडल्या. डॉक्टर होवून भारतात परतल्या नंतरच्या त्यांच्या हयातीतील ३-४ महिने त्या आजारी असल्याने भारतात रूग्णसेवा करू शकल्या नाही, परंतु त्या व बंगालच्या कादिंबीनी बोस ह्या भारतातील प्रथम महिला डॉक्टर होत्या यात शंका नाही. आजारामुळे आनंदीबाईंना रुग्णसेवा करता आली नाही.
आता दुसरे उदाहरण बघू डॉ रखमाबाई राऊत यांचे. कृपया तारखा नीट वाचा.
जन्म २२-११-१८६४, ईंग्लंडमध्ये १८९४ ला डॉक्टर झाल्या. भारतात १८९५ मध्ये परतल्यानंतर पुढील ३०-४० वर्ष त्यानी भारतामध्ये रुग्णांची सूश्रूषा केली. या दरम्यान त्यांनी स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण तसेच इतरही सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड कार्य केले. ९१ वर्षाचे दीर्घायुष्य जगून १९५५ ला निधन झाले.
बालविवाहा विरुद्ध त्यांचा स्वतःचा न्यायालयीन यशस्वी लढा तर अत्यंत वाचनीय व प्रत्येक भारतीय स्त्रीकरिता अभिमानास्पद आहे. त्यांच्या या लढ्याच्या परिणामस्वरूप ‘एज ऑफ कॉन्सेंट एक्ट, 1891’ नावाचा कायदा तयार झाला. एवढे प्रचंड व्यक्तिमत्व असूनही आम्हा कुणाला त्यांचेबद्दल माहिती नाही शासनालाही घेणे देणे नाही. काय म्हणावे या कोडगेपणाला.
‘मी सिंधुताई सपकाळ’ या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी आनंदीबाई जोशींवर सिनेमा काढावयाचे ठरविले होते. पण अभ्यासादरम्यान त्यांना रुखमाबाई राऊतांबाबत माहिती भेटली व त्यांनी मानस बदलविला. कारण आनंदीबाईंनी भारतात रुग्णसेवाच केली नाही असे त्यांच्या लक्षात आले. याबाबत दि २९-५-२०११ ला मिड-डे या दैनिकात एक लेख सुद्धा प्रकाशित झाला. “Dr. Rukhmabai steals ‘first’ lady doc’s thunder”. बीबीसी ने रुखमाबाईंवर एक छान लेख प्रकाशित केलेला आहे https://bit.ly/35lyumL(हि लिंक खालील कंमेन्ट बॉक्स मधून वाचता येईल) जेष्ठ अभ्यासिका छायाताई महाले यांनीसुद्धा या विषयी मोलाचे संशोधन केलेले आहे.
आज डॉज रखमाबाई राऊत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानाचा मुजरा.