राजधानीत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

0
14

नवी दिल्ली, दि. १२ : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय  केंद्रात साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त   डॉ. निरुपमा  डांगे  यांनी  राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद  यांची जयंती साजरी करण्यात  आली. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी  तथा  उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

गोंदिया,दि.12 : 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद
यांचे जयंतीचा कार्यक्रम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे
अधिष्ठाता डॉ.अपुर्व पावडे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.

सदर कार्यक्रमात अधिष्ठाता डॉ.अपुर्व पावडे यांनी राजमाता जिजाऊ व
स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
तसेच या थोर व्यक्तीमत्वाबाबत त्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी
नेत्र विभागप्रमुख डॉ.राऊत, वैद्यकीय अधीक्षक डॉ.जयस्वाल, तसेच डॉ.पाटील,
डॉ.यादव, श्री घारड आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम समाजसेवा अधीक्षक श्री कुचनकर, श्री लांजेवार,
श्रीमती खोटे, श्री शंभरकर व छायाचित्रकार श्री ढोले यांचे समन्वयाने
यशस्वीरित्या पार पडले. कार्यक्रमाकरीता अटेंडन्ट श्री रामटेके व श्री
महावत यांनी सहकार्य केले.

राजमाता जिजाऊ यांना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले अभिवादन

बुलडाणा, (जिमाका) दि. १२ :राजमाता जिजाऊ यांचा आज ४२४ वा जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजना कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करीत सध्या पद्धतीने करण्यात आले. सदर जन्मोत्सव सोहळा सिंदखेडराजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यातील राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मठिकाणी आयोजित करण्यात आले.
जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी जिजाऊ यांच्या पुतळ्याचं पूजन करून अभिवादन केले. यावेळी जिजाऊ वंदनेचे गायन करण्यात आले. राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी काही युवक राजे छत्रपत्री शिवाजी महाराजाच्या वेशभुषेत, तर युवती, महिला जिजाऊ यांच्या वेशभूषेत आल्या होत्या. यावेळी नगराध्यक्ष सतिष तायडे,माजी नगराध्यक्ष ॲड नाझेर काझी, उपनगराध्यक्ष रूख्मीणीबाई तायडे, उपविभागीय अधिकारी भुषण अहीरे, तहसीलदार सुनील सावंत, मुख्याधिकारी प्रशांत भटकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले.