35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Featured News “कट्यार काळजात घुसली …”नाट्यप्रयोगानेे नाट्यप्रेमी भारावले

“कट्यार काळजात घुसली …”नाट्यप्रयोगानेे नाट्यप्रेमी भारावले

0
16

blank

गोंदिया,दि.08ःयेथील मनोहरभाई पटेल अकॅडमी द्वारा आयोजित स्वरवेध नागपूरच्या वतीने प्रस्तुत “कट्यार काळजात घुसली …” हा नाट्य प्रयोग सुमधुर संगीत व नामवंत कलावंताच्या सादरीकरनाने प्रथमच गोंदिया शहरासह जिल्ह्यातील नाट्य रसिकांसाठी अद्भूत व अविस्मरणीय ठरला.blank एन.एम.डी. महाविद्यालय गोंदियाच्या सभागृहामध्ये एड.भानुदास कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या संगीत कट्यार काळजात घुसली ….. एक अनुभूती या मराठी रंगभूमीवर अधिराज्य गजविणाऱ्या दैदिप्यमान, अभिजात आणि अजरामर संगीत नाटकाच्या प्रयोगप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन,आमदार विनोद अग्रवाल,आमदार राजूभाऊ कारेमोरे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे,गंगाधर परशुरामकर,नरेश माहेश्वरी,भानुदास कुलकर्णी,शिला धोटे, डॉ शिला कुलकर्णी,निखिल जैन, यशवंत गणवीर व हजारोच्या संख्येने नाट्यरसिक उपस्थित होते.

blank