Home Featured News फिल्म तेजाब कांड चे आॅडिशन गोंदियात

फिल्म तेजाब कांड चे आॅडिशन गोंदियात

0

गोंदिया, मलेशिया, शिमला, मुंबईमध्ये होणार शुटींग
प्रतिनिधी गोंदिया:- गोंदियामध्ये अगोदर बनलेली प्रथम हिंदी चित्रपट हजारो रंग प्यारे के यांचे निर्माता राजेश कापसे आर.के. फिल्मस व गोंदिया शहराचे युवा राकेशबाबु टेंभरे निर्माता हंसराज क्रिएटीव चित्रपटाचे दोन्ही निर्माताव्दारे गोंदिया शहरात सध्या गाजत असलेल्या मराठी चित्रपट सैराट यासारख्या सत्य घटनेवर, वास्तविक अभिनय व ग्रामीण जीवनावर मराठीमध्ये बनवण्यात येणार आहे. मराठी चित्रपट तेजाबकांड यामध्ये सुप्रसिध्द चित्रपट जगातील मोहन जोशी, रीमा लागू यांची मुख्य भूमिका असून या चित्रपटात पहिल्यांदा गोंदिया शहरातील निर्देशकानी स्थानीक कलाकारांना चित्रपटातील मुख्य भूमिका देण्याचे ठरविले आहे. या चित्रपटामध्ये हिरो, हिरोहीनसह अभिनेता, अभिनेत्री बालकलाकार ज्येष्ठ कलाकार व विलन या कलाकारांसाठी तीन दिवसीय मेगा आॅडीशन व स्क्रिन टेस्ट गोंदिया येथील शासकिय विश्रात गृह रेस्ट हाउस गोंदिया येथे दि. ९,१०,११ जुलै २०१६ सकाळी ९ ते संध्योकाळी ६ वाजतापर्यंत चित्रपट डायरेक्टर मुंबइ चे कबीर व कॉस्ट्युम डाययरेक्टर अनंत शर्मा यांच्या व्दारे घेण्यात येणार आहे.

Exit mobile version