Home Featured News एक दिवस अन्नदात्यासाठी राज्यभर उपवास

एक दिवस अन्नदात्यासाठी राज्यभर उपवास

0

यवतमाळ दि. 19:गेल्या वर्षभरात राज्यात जवळपास 3 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा सरकारचाच आकडा आहे. 19 मार्च 1986 रोजी यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाण गावात साहेबराव करपे यांनी त्यांची दोन मुलं आणि पत्नीसह आत्महत्या केली होती.त्या आत्महत्येला आज 31 वर्षे पूर्ण झाले. त्यासाठी आज राज्यात सगळीकडे उपवास करण्यात आले होते.काळ्या रांगोळी काढून शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध नोंदविण्यात आला.यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील चिलगव्हान या स्वर्गीय साहेबराव करपे पाटील यांच्या गावात आज अन्नत्याग आंदोलनसाठी गावकरी बसले. रविंद्र तुपकर यांची हजेरी.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव इथं मुख्य उपोषण संध्याकाळी 6पर्यंत आहे.घरोघरी पांढरी रांगोळी आणि त्यात काळे ठिपके काढून निषेध व्यक्त करण्यात आले आहे आणि नेर तालुक्यातील सातेफल गावातही घरोघरी रांगोळी काढून आंदोलन करण्यात आले.अमर हबीब यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे.

Exit mobile version