Home Featured News कु.सानिका गडदे हिला गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्कार

कु.सानिका गडदे हिला गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्कार

0

सांगली /जत ,दि.31-;विश्वभूषण व महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंती व बुध्द जयंती निमित्त भिमराज प्रतिष्ठान जयंती उत्सव मंडळ व्हसपेट ता.जत. जिल्हा सांगली च्या वतीने तालूक्यातील गुणवंत गरिब व होतकरु, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देवून विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.यामध्ये कु .सानिका राजाराम गडदे इयत्ता ४थी हीला गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. तिचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष प्रविण कांबळे, सचिन झेंडे,सचिव चेतन हुवाळे,खजिनदार बापू हुवाळे,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .सानिकाचे शाळा व्यवस्थापन समिती बाबरवस्तीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, सर्व सदस्य व गावातील सर्व नागरिक व तिचे वर्ग शिक्षक दिलीप वाघमारे व केंद्र प्रमुख के.बी.पुजारी यांनी अभिनंदन केले .सानिकाला ५० पर्यत पाढे पाठांतर असून इंग्रजी स्पेलिंगचे २००० हजारच्या जवळ शब्द पाठ आहेत. शाळेतील सर्व उपक्रमात हिरहिरेणे भाग घेत असते याची दख्खल भिमराज प्रतिष्ठान जयंती मंडळानी घेतले.पांडोझरी परिसरातून सर्वत्र सानिका गडदेचे कौतुक होत आहेत .

Exit mobile version