Home Featured News जर्मनीसह चार देशांच्या पर्यटकांची नागझिरा भेट

जर्मनीसह चार देशांच्या पर्यटकांची नागझिरा भेट

0

गोंदिया – नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाची स्थापना डिसेंबर 2013 मध्ये झाली. त्यानंतर येथील वनसंपदा, वाघ व इतर प्राण्यांची इत्थंभूत माहिती एनएनटीआर या संकेतस्थळावरून जाहीर झाली. या ऑनलाइन बुकिंगला प्रतिसाद देत मागील वर्षात 23 विदेशी पर्यटकांनी नागझिऱ्याला भेट दिली.

जर्मनीसह जपान, स्वित्झर्लंड, इंग्लंड आणि अमेरिका येथील हे पर्यटक आहेत. ताडोबा, मेळघाट, बोर आणि पेंच व्याघ्रप्रकल्पाचेही सौंदर्य त्यांनी न्याहाळले. एप्रिलमध्ये पिटेझरी प्रवेशद्वारावरून बारा पर्यटक, ऑक्‍टोबरमध्ये उमरझरी गेटवरून दहा आणि नोव्हेंबरमध्ये एक विदेशी पर्यटकाने हजेरी लावली. पहिल्यांदाच विदेशी पर्यटक आल्याने व्याघ्रप्रकल्प फाउंडेशनने व्हीआयपी व्यवस्था केली. त्यांना प्रकल्पाची माहिती देत पर्यटन आणि सेवेबाबतीत अभिप्रायही नोंदवून घेतले. व्याघ्रसंवर्धनाबाबत काय उपाययोजना करण्यात येतात, याचाही तपशील येथील वनक्षेत्रसहायकांकडून त्यांनी ऐकून घेतला. गुड ऍक्‍टिव्हिटीचा शेराही ते नागझिऱ्याला द्यायला विसरले नाहीत. विदेशी पर्यटकांकरिता केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने ठरविलेल्या धोरणानुसार पर्यटन शुल्क घेण्यात येते. अनिवासी भारतीयांच्या शीर्षाखाली दुप्पट रक्‍कम घेण्यात आली. भारतीय पर्यटकांकडून 50 रुपये घेण्याची तरतूद आहे. आगामी काळात विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इको-टेंट, गोवाबेस सॅंड हट, भोजन आणि गाइडना इंग्रजीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Exit mobile version