Home Featured News पंजाब प्राईड गिनी माही 15 गोंदियात

पंजाब प्राईड गिनी माही 15 गोंदियात

0
@प्रबोधन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
गोंदिया,दि.12 : आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या प्रबोधनकार पंजाब प्राईड गिनी माही 15 एप्रिल रोजी गोंदिया येथे येत आहेत. त्याच दिवशी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि जे एन यु दिल्लीचे राहुल सोनपिंपळे यांचे प्रबोधन प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन 14 आणि 15 एप्रिल रोजी सुभाष शाळा मैदान गोंदिया येथे करण्यात आले आहे. जयंती उत्सव निमित्त पंजाब प्राईड गायिका गिनी माही 15 एप्रिल ला रविवारी सायंकाळी 6 वाजतापासून प्रबोधन कार्यक्रम सुरू होणार आहे. हे प्रबोधन कार्यक्रम जयंती उत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. याच दिवशी सकाळी 10 वाजता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पार पडणार आहे. महसूल विभागाच्या सहायक आयुक्त धनंजय वंजारी, सहायक आयुक्त गौरव मेश्राम, माजी कुलसचिव विलास इलपाचे मार्गदर्शन करणार आहेत. अमरावतीचे धर्मेंद्र सरदार प्रबोधन प्रशिक्षण शिबीर घेणार आहेत. जे एन यु विद्यापीठ दिल्लीचे राहुल सोनपिंपळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. 14 एप्रिल रोजी आंबेडकरी विचारवंत प्रा. पी. एस. चांगोले, बहुजनवादी वक्ता अजाब शास्त्री, धम्म प्रचारक इंजि. किशोर बरमाटे मार्गदर्शन करतील. या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योतिप्रकाश गजभिये राहणार आहेत. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रबोधनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Exit mobile version