Home Featured News सर्वात सुंदर रेल्वे स्टेशनच्या स्पर्धेत चंद्रपूर-बल्लारपूरने मारली बाजी

सर्वात सुंदर रेल्वे स्टेशनच्या स्पर्धेत चंद्रपूर-बल्लारपूरने मारली बाजी

0

चंद्रपूर,दि.03- भारतीय रेल्वेकडून आयोजित करण्यात आलेल्या सर्वात सुंदर रेल्वे स्टेशनच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि बल्लारशाह रेल्वे स्टेशनने संयुक्तपणे पहिला क्रमांक मिळवला आहे. तर बिहारमधील तामिळनाडूमधील मदुरै आणि बिहारमधील मधुबनी या स्टेशनने संयुक्तपणे दुसरा क्रमांक पटकावला. तिसरा पुरस्कार संयुक्तपणे गुजरातच्या गांधीधाम, राजस्थानच्या कोटा आणि तेलंगणातील सिंकदराबाद स्थानकांना मिळाला.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात येणाऱ्या या चंद्रपूर आणि बल्लारपूर या दोन्ही स्टेशनवर ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि स्थानिक आदिवासी कलेवर आधारीत चित्र, भित्तीचित्र आणि मूर्ती लावून सुंदर बनवण्यात आले आहे. बिहारमधील मिथिला विभागात येणाऱ्या मधुबनी स्थानकावर येथील जगप्रसिद्ध चित्रकला रेखाटण्यात आली आहे. यामुळे या स्थानकांच्या सैदर्यात वाढ झाली आहे. 2 ऑक्टोबर 2017 रोजी गांधी जयंती निमित्ताने मिथिला चित्रकला काढण्यास सुरुवात झाली. ही चित्रकला काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात कलाकार आले होते. 20 विविध विषयांवर या स्थानकावर चित्र काढण्यात आली आहेत. चंद्रपूर बल्लापूर रेल्वे स्टेशनला 10 लाखांचे बक्षीस मिळणार आहे तर मधुबनी आणि मदुरै रेल्वे स्टेशनला 5 लाखांचा पुरस्कार दिला जाणार आहे. तर तिसरा क्रमांक पटकावणा-या स्टेशनला प्रत्येकी 3 लाख रुपये दिले जाणार आहेत.

Exit mobile version