Home Featured News अटलबिहारी वाजपेयींना शुक्रवारी ‘भारतरत्न’ प्रदान करणार

अटलबिहारी वाजपेयींना शुक्रवारी ‘भारतरत्न’ प्रदान करणार

0

नवी दिल्ली – भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना 27 मार्च रोजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. राष्ट्रपीत प्रणव मुखर्जी राजकीय शिष्टाचार बाजूला ठेवत वाजपेयींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार देणार आहेत.गेल्यावर्षी २५ डिसेंबरला वाजपेयींच्या वाढदिवसी राष्ट्रपती भवनाकडून त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. १९९८ ते २००४ या काळात ते सलग पंतप्रधानपदावर कार्यरत होते. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱया कॉंग्रेसविरहीत सरकारचे ते पहिले पंतप्रधान होते. ५० हून अधिक वर्षे राजकारणात सक्रिय असलेल्या वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या पाश्र्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारने वाजपेयी यांना भारतरत्न देण्याची शिफारस प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली होती.

Exit mobile version