गोंदिया,दि.07:- गोंदिया नगरपरिषदेतंर्गत शहरातील स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणार्या १२२ महिला सफाई कामगारांचा महिला दिनाचे औचित्य साधत जेसीआय,राईस सिटी गोंदिया या सामाजिक संघटनेने सत्कार केला.विशेष म्हणजे पहिल्यांदा कुणी आपला सत्कार करीत असल्याचे बघून या सफाई कामगार महिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गोंदियाचे जेसीआईचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम मोदी,एड निलू मांढरे, नगरसेविका मालती कापसे, पूजा ढोके, जेसीआई गोंदिया राईस सिटीच्या अध्यक्ष ऋतुजा खेडीकर, सचिव भारत चंद्रबघेले व प्रोजेक्ट डायरेक्टर शबाना अंसारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जेसीआय शताब्दी पाल यांनी केले. तर आभार जेसीआय राईस सिटीचे सचिव भरतचंद्र बघेले यांनी मानले. यशस्वीतेसाठी जेसीआई गोंदिया राईस सिटीचे सौरभ जैन, अंकुश डोडानी, रवी सपाटे, व संध्या वाहने, शताब्दी पाल, कल्याणी गाडेकर, त्रिवेणी डोहरे, सुरेखा बोरकर, पियुष गोसेवाडे, राजा मिश्रा, सौरभ रोकडे, इतर जेसीआई चे सदस्य यांनी परिश्रम घेतले.
जेसीआयने केला महिलादिनानिमित्त स्वच्छता करणाऱ्या 122 महिलांचा सत्कार
महिला दिनाचे औचित्य साधून जेसीआई गोंदिया राईस सिटीचा उपक्रम