लग्न पत्रिकेतून सामाजिक एकतेचा संदेश

0
381

सालेकसा,दि.20 : सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या दिव्या फांऊडेशनचे सामाजिक कार्यात तसेच विवाह सोहळयात नेहमी नाविण्यत्व असते. ही परंपरा कायम ठेवत दिव्या फांऊडेशनचे कालीमाटी येथील समन्वयक सचिन हेमंतराव फुंडे यांचा विवाह सोहळा काही दिवसांनी असून लग्न पत्रिकेतून सामाजिकतेचा जागर करणारे विविध संदेश दिले.

वैज्ञानिक काळात आपण जगत आहोत आणि काळानुरूप लग्न पद्धतीही बदलणे आवश्यक आहे. आज बरीच मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहतात. गरीब मुलांना तर जन्मजातच बालमजुरी हा हुद्दा त्यांच्यासाठी मारला गेला हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे व त्यांचे ही जीवन सुखी तसेच आनंदी व्हावे म्हणून अनाथ, बेघर, बेसहारा, दीनदुबळ्या, निराधार अशा मुलांच्या शिक्षणासाठी लागणार्‍या प्रत्येक वस्तू लग्नामध्ये दहेज व भेटवस्तू च्या रूपात जसे की, वही-पेन, पुस्तके लग्नामध्ये भेट म्हणून द्याव्यात त्या गरजू मुलांना देता येईल, असे आवाहन पत्रिकेच्या माध्यमातून करण्यात आले. ही लग्नपत्रिका नवीन्यपूर्ण असून फुंडे यांच्या या उपक्रमाची सर्वत्र कौतुक केले जात आहे.