हरयाणाच्या यमुनानगरमधील टोपरा कलागावात जानेवारी २०१९ मध्ये उभारण्यात आलेल्या धम्मचक्राची नोंद देशातील सर्वांत मोठे धम्मचक्र म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून, तसे सर्टिफिकेट गावाला दिले गेले आहे. या भल्या मोठ्या चक्राचा व्यास ३० फूट असून त्यात २४ आऱ्या आहेत.२,५०० वर्षांपूर्वी सध्या जे अशोक चक्र म्हणून ओळखले जाते त्याला धम्मचक्र असे म्हटले जात असे. हे चक्र आपले राष्ट्रीय चिन्ह आहे.
यमुनानगरमधील धम्मचक्र सिद्धार्थ आणि सत्यदीप या दोघा भावांनी उभारले आहे. त्यांना ग्रामपंचायतीने सहाय्य केले. हे चक्र तयार करणे मोठे आव्हान होते. त्यामुळे जागेवर आणूनच त्याचे सर्व भाग तयार केले व तेथेच जोडले. हे धम्मचक्र तयार करण्यास २४० दिवस लागले. या संदर्भात डॉ. सत्यदीप गौरी म्हणाले की, या चक्राचा उपयोग पूर्वी बुद्ध आणि त्याचे विचार स्वरूपात होत असे. सम्राट अशोकाने धम्मचक्राला त्याच्या धर्मस्तंभाच्या वरचे स्थान दिले. या धम्मचक्रात २४ आऱ्या आहेत. त्यातील पहिले १२ बुद्धाचे विचार आणि बाकीचे १२ मनाच्या तटस्थ अवस्थेचे प्रतीक आहेत.ाच्यामुळे निर्वाणाचा मार्ग मिळतो. या धर्मचक्राचा रंग सोनेरी असून हा रंग अध्यात्मात सर्वांत शुद्ध रंग समजला जातो.