रविवारला आयोजित ८ विवाह व एक वास्तुपूजन स्थगित

0
335

गोंदिया,दि.२१: राज्यात कोरोनाचा वाढताप्रभाव लक्षात घेता सुरक्षेवर भर देण्यात आले असून लग्नसमारंभासह इतर कार्यक्रमातील संख्येवर निर्बंध घालण्यात आले आहे.त्यातच उद्या रविवारला दि.२२ मार्च रोजी जनता कर्फु देशभर नि्धारित करण्यात आल्याने गर्दी टाळण्यासाटी जिल्ह्यात आयोजित ८ व एक वास्तुपूजन कार्यक्रम समुपदेशनाने रद्द करण्यात आले आहे.
त्यामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यात 22 तारखेला होणारे 6 विवाह व 1 वास्तुपुजन कार्यक्रम समुपदेशनाद्वारे स्थगित करण्यात आले आहे. याकरीता पंचायत समिती सदस्य जनार्दन काळसरपे, सरपंच महालगाव अशोक कापगते, सरपंच सिलेझरी प्रकाश टेंभुरने, सरपंच बोण्डगाव/देवी राधेश्याम झोडे व तसेच वर व वधु यांचे पालक, गावातील जेष्ठ नागरिक यांची बैठक घेऊन समुपदेशन करून विवाह सोहळे स्थगित करण्यात आले.त्याचप्रमाणे गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथेही रविवारला होणारा विवाहसोहळा रद्द करण्यात आला आहे.सालेकसा तालुक्यातील रवि ब्राम्णकर यांच्याकडील लग्न ही रद्द  करण्यात आले आहे.