42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home हिंदी खबरे “आखरी सांस तक उद्धव ठाकरेसाहब के साथ.” मुस्लिम तरुणाने स्वतःच्या रक्ताने लिहिले...

“आखरी सांस तक उद्धव ठाकरेसाहब के साथ.” मुस्लिम तरुणाने स्वतःच्या रक्ताने लिहिले पोस्टर

0
43

blank

मुंबई – आज विजयादशमीचा मुहूर्त साधत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा आज शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे.शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झालेली असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे.अशात एका मुस्लिम कार्यकर्त्याने उद्धव ठाकरेंना आपला पाठींबा दर्शवण्यासाठी थेट रक्ताने पोस्टर लिहिल्याचे समोर आले.

अजिज मोमीन या मुस्लिम कार्यकर्त्याने ‘आखरी सांस तक उद्धव ठाकरेसाहब के साथ रहुंगा, मुस्लीम मावळा अजिज मोमीन’ अशा आशयाचे पोस्टर आपल्या रक्ताने लिहिल्याचे पाहायला दिसून आले. पहाटे ३ वाजल्यापासून हा कार्यकर्ता आल्याचे समजते. हा कार्यकर्ता मूळचा अहमदनगर जिल्ह्यातून आला होता. आमचे लाडके पर्मनंट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे १८ बगड जातींना सोबत घेऊन चालले असल्याच्या भावना यावेळी एका वृत्त वाहिनीशी बोलताना या कार्यकर्त्याने व्यक्त केल्या.

आज उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देणार ? तसेच शिंदे गटावर कशा पद्धतीने टीका करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे,

blank