गोंदिया/मुंबई : राज्य़ातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर आता पोलीस निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काहींना 2021 च्या सार्वत्रिक बदल्यांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील तब्बल 685 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.या बदल्यामध्ये मात्र नक्षलग्रस्त गोंदिया गडचिरोली जिल्हयातून जाणारे पोलीस निरिक्षक अधिक असून त्या तुलनेत त्याठिकाणी मात्र येणारे कमी असल्याने गोंदियाचे पालकमंत्री व राज्याचे गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांचे पालक जिल्ह्याकडे लक्ष नसल्याचेच या बदल्यावंरुन दिसून येत आहे.
या नि:शस्त्र पोलीस निरिक्षकांना बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बदली झालेल्या अधिकाऱ्याच्या जागेवर कोण येत आहे याचीही वाट पाहू नये असे आदेश देण्यात आले आहेत. संबंधीत प्रमुखांनी याची नोंद घ्यावी असेही या आदेशात म्हटले आहे. बदली आदेशातील अधिकाऱ्यांचे काही कारणास्तव निलंबन झालेले असल्यास तसा अहवाल पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठविण्याचे आदेश देण्या आले आहेत. गोंदिया जिल्ह्यातून गोरेगावचे पोलीस निरिक्षक सुरेश नारनवरे नागपूर शहर, गोंदिया ग्रामीणचे पोलीस निरिक्षक मनोहर दाभाडे यांची पोलीस अकादमी नाशिक,शशिकांत दसुरकर यांची सांगली,नवेगावबांधचे दिनकर ठोसरे नागपूर शहर,कृष्णा कोकणी ठाणे शहर,उमेश पाटील यांची रा.गु.वि येथे,तर बृहनमुंबई येथील सदानंद माने यांची गोंदिया,वर्धा येथील योगराज पारधी गोंदिया आणि नागपूर ग्रामीणचे दिपक वंजारी यांची गोंदिया येथे बदली करण्यात आली आहे.
बदली .यादी 437