मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आज उद्घाटन

0
32

भंडारा, दि.7: कोरोना कालावधीत आरोग्य यंत्रणेला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला असून या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते 8 जुलै 2021 रोजी ऑनलाईन पध्दतीने दुपारी 3 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील प्रशिक्षण केंद्रात करण्यात येणार आहे.

               मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्ह्याला 300 उमेदवार प्रशिक्षीत करण्याचे उदिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये यांना प्रशिक्षण संस्था म्हणून थेट ग्रिन चॅनेलव्दारे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्यासोबत इंम्प्लीमेंट करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी कडून एकूण 36 कोर्सची निवड करण्यात आलेली होती. त्यापैकी 4 जॉब रोल्स मध्ये प्रशिक्षण केंद्रांना कार्यादेश देण्यात आलेले आहेत. उमेदवारांचे समुपदेशन पूर्ण होवून तुकडी देखील प्रशिक्षणासाठी तयार करण्यात आली आहे.