‘लोकराज्य’चा सप्टेंबर महिन्याचा अंक प्रकाशित

0
21

मुंबई,  दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’चा सप्टेंबर महिन्याचा अंक प्रकाशित झाला आहे. ‘सर्वांसाठी घरे’ या विषयाला वाहिलेल्या या अंकात राज्य शासन राबवित असलेल्या गृहनिर्माण प्रकल्प आणि योजनांची माहिती देण्यात आली आहे. राज्यात महाआवास योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. म्हाडा आणि सिडको करीत असलेल्या कार्याबद्दल माहिती अंकात देण्यात आली आहे. विशेषतः ग्रामीण भागात वंचित आणि उपेक्षित घटकांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे अनेक कुटुंबांना हक्काचे घरकुल मिळाले आहे. याबाबतच्या यशकथांचा समावेश हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे.

याबरोबरच अंकात मंत्रिमंडळाने जनहिताच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांची माहितीही करून देण्यात आली आहे. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/  या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.

अंक वाचण्यासाठी https://mahasamvad.in/?p=48261 या लिंकवर क्लिक करा.