दिलखुलास’ कार्यक्रमात ‘अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा’ या विषयावर प्रा.श्याम मानव यांची उद्या मुलाखत

0
20

मुंबई, दि. १६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘अंधश्रद्धा आणि जादुटोणा विरोधी कायदा’ या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक तसेच जादुटोणा विरोधी कायदा प्रचार समितीचे सहअध्यक्ष प्रा.श्याम मानव यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच न्यूज ऑन एअर या ॲपवरून शुक्रवार दि.१७ ते बुधवार दि.२२ सप्टेंबर या दिवशी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत  प्रसारित होणार आहे. निवेदिका डॉ.मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीत “महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळी जादू अधिनियम 2013” मधील १२ कलमे, कलमांची माहिती, भूत काढून टाकण्याच्या बहाण्याने फसवणूक करणे, चमत्कार करण्याच्या क्षमतेचा दावा करणे, एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे यासह इतर कलमांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या  विधेयकाची  अंमलबजावणी याबाबत सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमात प्रा. श्याम मानव यांनी दिली आहे.