राज्यात तीन दिवस नववर्षाचे सेिलब्रेशन दणक्यात!

0
7
मुंबई दि.२२- नववर्षाचे स्वागत करण्याचे वेध आतापासून सर्वांना लागले असताना राज्य सरकारने स्वागतोत्सुकांना खुशखबर दिली आहे. ख्रिसमसच्या अाधीचा एक दिवस, ख्रिसमस तसेच ३१ डिसेंबर असे तीन दिवस रात्री १ वाजेपर्यंत दारूची दुकाने, बार, पब आणि हाॅटेल्स पहाटे ५ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. राज्याचा गृह विभाग तसेच उत्पादन शुल्क विभागाकडून याबाबतचे पत्रक काढण्यात आले आहे.
डिसेंबरचा शेवटचा आठवडा आला की सर्वांनाच वेध लागतात ते नववर्षाचे. मित्र परिवाराच्या साथीने आधीच्या वर्षाला अलविदा करण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पेल्यावर पेले रिचवण्यासाठी दुकाने सुरू राहणार आहेत की नाही, याची माहिती घेतली जाते. शेवटपर्यंत पेले रिकामे राहू नयेत, काही कमी पडू नये, हीच यामागची काळजी असते. ही काळजी आता गृह तसेच उत्पादन शुल्क विभागाने दूर केली आहे.
इतर दिवशी रात्री साडेदहापर्यंत दारूची दुकाने उघडी करण्यास परवानगी असते. मात्र २४, २५ व ३१ डिसेंबरला रात्री १०.३० ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत ही दुकाने उघडी राहणार आहेत. तर बिअर बार, पब रात्री १०.३० एेवजी पहाटे ५ पर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.