मंत्रालयात रंगला अभिवाचन कट्टा

0
16

मुंबई, दि. 14 : वाचन प्रेरणा दिनाच्या पूर्व संध्येला आज दि. 14 ऑक्टोबर रोजी मंत्रालयीन विभाग व क्षेत्रिय कार्यालये अधिकारी, कर्मचारी यांनी अभिवाचन व काव्यवाचन केले. रोजच्या कामकाजाव्यतिरिक्त साहित्य वाचनाची आवड जपणाऱ्या या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे मंत्रालयात अभिवाचन कट्टा रंगला.

भाषाविभागाचे सहसचिव मिलिंद गवादे यांच्यासह मराठी भाषा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. अभिवाचन केलेल्या वाचकांना पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रशांत साजणीकर, अभय येडसीकर, विशाल जोंधळे, दिपक देवळे, श्रीमती राजश्री बापट, श्रीमती मंगल नाखवा यांनी विविध उताऱ्यांचे अभिवाचन केले. तर अजय भोसले, सतिश जोंधळे, सतिश मोघे, विशाल जोंधळे, श्रीमती मिनाक्षी पाटील, श्रीमती स्वाती पाटील, श्रीमती मंगल नाखवा यांनी कविता सादर केल्या.