मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रातर्फे व्यंगचित्र कार्यशाळेचे आयोजन

0
9

मुंबई, दि. १8 नोव्हेंबर: मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रामार्फत आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व्यंगचित्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाय्या फोर्ट संकुलातील दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर हे लाभले होते. तर एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या फाईन आर्ट विभागाच्या प्राध्यापिका मीरा सांवत यांचीही उपस्थिती लाभली होती. मुंबई विद्यापीठाच्या विविध संलग्नित महाविद्यालयातील एकूण ७० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करून कला क्षेत्रातील अनुभव विशद केले. या क्षेत्रात निरीक्षण आणि कलेची आवड महत्वाची असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तर प्रा. मीरा सांवत यांनी कलेच्या शिक्षणाचे महत्व विशद करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध विद्यार्थ्यांनी व्यंगचित्र काढून मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घेतले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.