34.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home महाराष्ट्र राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या सचिवालयाचे उद्घाटन

राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या सचिवालयाचे उद्घाटन

0
16

मुंबई, दि. १६:  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज दुपारी राज्यपालांच्या सचिवालयाचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उद्धाटनानंतर सचिवालयाची पाहणी उपस्थित मान्यवरांनी केली.

blank

मुख्यमंत्री यांनी घेतली राज्यपाल यांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रत्नागिरीचा दौरा नियोजित होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांच्या सचिवालयाचे उद्धाटन होणाऱ्या इमारतीची पाहणी केली. यावेळी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, बंदरे व खानिकर्म मंत्री दादा भुसे उपस्थित होते.