राज्यपाल रमेश बैस यांची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकास भेट

0
5

सातारा दि. २३ – राज्यपाल रमेश बैस यांनी नायगाव, (ता. खंडाळा) येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि शिल्पसृष्टीला सहकुटुंब भेट दिली.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य देशासाठी आदर्श असल्याची भावना राज्यपाल श्री. बैस यांनी व्यक्त केली. यावेळी नायगाव ग्रामस्थांनी राज्यपाल श्री. बैस यांचा सत्कार केला. तसेच राज्यपाल श्री. बैस यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष कार्य अधिकारी महेश गोलाणी, अपर जिल्हाधिकारी तथा राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार चेतन मोरे,  नायगावच्या सरपंच साधना नेवसे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.