पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

0
6

मुंबई दि.२६ : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातील ५० गावांमध्ये भव्य व सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी दिली आहे.

नुकत्याच झालेल्या बैठकीत श्री महाजन यांनी या ५० गावात सामाजिक सभागृह उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली . या माध्यमातून जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, जालना, नंदुरबार, पुणे, नांदेड, यवतमाळ, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, अमरावती, नागपूर आदी जिल्ह्यांतील गावांची निवड करण्यात आली असून लवकरच बांधकाम करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. महाजन यांनी दिली.

विविध जिल्ह्यातील पहूरपेठ, वाकोद, पहुरकसबे, ता. जामनेर, लोहारा, कुऱ्हाड. ता, पाचोरा,  म्हसावद ता.जळगाव, अहिरवाडी, ता रावेर. शिरसाळा, ता.बोदवड, चहार्डी ता. चोपडा, पाळधी, ता.धरणगाव, निमगाव घाना, ता.अहमदनगर, मोहरी  ता.पाथर्डी, आस्तेगाव. ता.राहाता, मुकिंदपूर  ता.नेवासा, पट्टनकोडोली, ता. हातकंणगले, आदमापूर ता. भुदरगड (गारगोटी), वाशी, ता. करवीर, घाणेवाडी ता. जालना, टेंभुर्णी, ता जाफराबाद, चिंचोली निपाणी, ता. भोकरदन, आनंदगाव, ता. परतुर, म्हसावद ता. शहादा, नागरे ता. पुरंदर, जाडकरवाडी ता. आंबेगाव, माळेगांव, रीसनगांव ता.लोहा, शेळगाव छत्री, ता. नायगाव(खै), वझरगा.ता देवलूर, नरसी, ता.नायगांव, पोफळी ता.उमरखेड, मंगलादेवी ता.नेर, चिखलगाव, ता.वणी, धनगरवाडी, ता.दारव्हा, मारवाडी बु. ता. पुसद, भरणे, ता.खेड, कांबळेश्वर, ता.फलटण, टाकेवाडी, ता.माण, वाठार स्टेशन, ता.कोरेगाव, तरंदल (धनगरवाडी) ता. कणकवली, खेडी, ता. सावली, बेम्बाळ, ता. मूल, थुतरा ता. कोरपना, तेमुर्डा ता. वरोरा, भंगाराम तळोधी, ता.गोडपिंपरी, नवरगाव ता.सिंदेवाही, वाठोडा शुक्लेश्वर ता.भातकुली, घोराड ता.कळमेश्वर, रोहणा -इंदरवाडा ता.नरखेड, बेला ता.उमरेड, केळवद, ता.सावनेर या ५० गावांचा  समावेश आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहासाठी निवडण्यात आलेल्या गावातील ग्रामपंचायतींच्या वतीने सभागृह बांधण्यासाठी जागेची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. याठिकाणी सुसज्ज  ५० सामाजिक सभागृह बांधण्यात येणार आहेत.