नॅचरोपॅथी रजिस्ट्रेशन बोर्ड सुरू ठेवायचं असेल तर डिप्लोमा धारकांना रजिस्ट्रेशन द्या : डॉ.अमीर मुलाणी

0
24

पुणे : नॅचरोपॅथी रजिस्ट्रेशन बोर्ड NRB यांच्यामार्फत सरसकट सर्व डॉक्टरांना रजिस्ट्रेशन द्या अन्यथा महाराष्ट्र राज्यांमध्ये सर्व डॉक्टरांच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी राष्ट्रीय अध्यक्ष आयुष भारत डॉक्टर असोसिएशन अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉ.एस.एन.सुतार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे आयुष भारत डॉक्टर असोसिएशनच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्षांनी केला आहे नॅचरोपॅथी डिप्लोमा चे शिक्षण घेतलेले 95 टक्के विद्यार्थी महाराष्ट्र राज्यात आहेत या विद्यार्थ्यांचे भविष्याचा विचार बोर्डाने केला पाहिजे डिप्लोमा धारकांची नोंदणी नसल्याकारणाने प्रशासनाकडून सुद्धा चुकीच्या कारवाई केल्या जात आहेत त्यामुळे नॅचरोपॅथीला बोगस असा शब्द शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडून केला जात आहे या शब्दाला पुर्ण अळा घालण्यासाठी डिप्लोमा धारकांना रजिस्ट्रेशन देणे अत्यंत गरजेचे आहे नॅचरोपॅथी बोर्डाने काही नियम व अटी घातलेले आहेत UGC विश्वविद्यालय अनुदान आयोगाची मान्यता असणारी विद्यापीठांची डिग्रीलाच रजिस्ट्रेशन व मान्यता दिली जाईल असे नॅचरोपॅथी रजिस्ट्रेशन बोर्डाने सांगितले आहे पण महाराष्ट्र राज्यामध्ये नॅचरोपॅथी डिग्री डॉक्टरांचा शंभरी आकडा पण पार करणे अवघड आहे तरी नॅचरोपॅथी रजिस्ट्रेशन बोर्ड पुणे यांनी सर्व डिप्लोमा धारक डॉक्टरांना सरसकट रजिस्ट्रेशन द्यावे अन्यथा आयुष भारत डॉक्टर असोसिएशनच्या वतीने राज्यभर हजारो डॉक्टरांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येणार आहे.