आपल्या प्रिंटिंग प्रेस मधील कर्मचाऱ्यांचा विमा उतरवावा- डॉ. जयपाल पाटील

0
20
वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुणे:-(विशेष प्रतिनिधी) आपल्या प्रिंटिंग प्रेस मधील सर्व कर्मचाऱ्यांचा विमा उत्तरविल्यामुळे प्रेस मध्ये घरून येताना व जाताना चुकून अपघात झाला तर त्याच्या कुटुंबीयांना वीमा रक्कम मिळाल्यामुळे कुटुंबीयांचं थोड्या प्रमाणात कल्याण होऊ शकतं यासाठी सर्व प्रेस मालकांनी आपल्या कारखान्यात असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा वार्षिक वीमा उतरवावा असे मार्गदर्शन आपत्ती व्यवस्थापन तज्ञ, रायगडभूषण डॉ.जयपाल पाटील यांनी चिंचवड पुणे येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषेश पाहुणे म्हणून मार्गदर्शनात सागिंतले. महाराष्ट्र मुद्रण परिषदेने दिनांक 13 14 व 15 जून असे तीन दिवस ऑटो कस्टर्ड एक्झिबिशन सेंटर पुणे येथे प्रिंटिंग व्यवसायाबाबत प्रदर्शन व मुद्रण परिषदेची कार्यकारणी बैठक अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर सरचिटणीस  नागेश शेडगे कोषाध्यक्ष किशोर गोरखे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. आयत्या वेळच्या विषयात अध्यक्षांच्या परवानगीने डॉ. जयपाल पाटील यांनी आपल्यावर आपत्ती कधी केव्हा येऊ शकते. यासाठी मुद्रकांनी आपल्या कामगारांचा विमा काढावा व प्रिंटिंग प्रेस पासून कुठेही जाता येताना. सध्या पाऊस असल्याने. जोरदार वीजा कडून कोसळण्याची शक्यता असते. यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने “दामिनी” अँप काढले असून ते आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करावे ते फायदेशीर ठरेल असे सांगितले.यावेळी अध्यक्ष आंबेकर यांनी आपल्या पनवेल येथील जागेवर. पण कर्मबाबतची प्रगती, सिडकोच्या पत्रव्यवहाराची माहिती व पुढील कार्यकारणीची बैठक गडचिरोलीत आमंत्रण आले आहे असे सांगितले. सभासदांच्या शंकांचे निरसन सरचिटणीस नागेश शेंडगे यांनी केले. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या मुद्रकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेऊन अध्यक्ष व नूतन कार्यकारिणी चे आभार मानले.